गणेश विसर्जन करून रात्री उशिरा माघारी परतणाऱ्या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. गणेश विसर्जनादिवशी (दि. १५ सप्टेंबर) रात्रभर पश्चिम रेल्वे लोकल सेवा सुरू ठेवणार आहे. या निर्णयामुळे उपनगरात राहणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. विरार ते चर्चगेट व चर्चगेट ते विरार ही लोकल सेवा रात्रभर चालणार आहे.
गणेश विसर्जनावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी रात्री पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट अशा तीन फेऱ्या ठेवल्या आहेत. पहिली फेरी रात्री १.१५, दुसरी २.२५ तर तिसरी फेरी ही पहाटे ३.२० वाजता असेल. तर विरारवरून चर्चगेटपर्यंत चार फेऱ्या होतील. १२.४५, १.४० व २.५५ अशा फेऱ्या होतील.