अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर प्रकल्पाला गती
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून मार्चपासून या मार्गावर १५ डब्यांच्या २४ फेऱ्याचालवण्याचा विचार होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार पट्ट्यात प्रवास करणाऱ्याप्रवाशांची संख्या अधिक आहे. अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरार स्थानकांत प्रवासी संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीतील प्रवास जीवघेणाच ठरतो. हा प्रवास सुकर करण्यासाठी अंधेरी ते विरार दरम्यान धिम्या मार्गावरही १५ डबा लोकल चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामाला दोन वर्षांपूर्वीच सुरुवात करण्यात आली होती.
जानेवारी २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाणार होता. परंतु अंधेरी, जोगेश्वरी, भाईंदर, वसई, विरार येथील काही तांत्रिक कामांत आलेल्या अडथळ्यांमुळे हा प्रकल्प एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानुसार कामाला गती दिली जात असताना मार्चमध्ये टाळेबंदी लागली आणि सुरुवातीचे तीन महिने काही प्रमाणात काम रखडले. त्यानंतर कामाला काहीशी गती देण्यात आली. प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून मार्च २०२१ पासून याच मार्गावर १५ डब्यांच्या २४ लोकल फे ऱ्यासुरू करण्याचे नियोजन आहे. सध्या १५ डब्यांच्या ५४ लोकल फेऱ्याचर्चगेट ते विरार, डहाणू स्थानकादरम्यान धावतात. साधारण वर्षभरात १५ डब्यांच्या एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४६ पर्यंत नेण्याचे पश्चिम रेल्वेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि लोकल प्रवासही सुकर होण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2021 1:15 am