व्हॉट्सअॅपवरील समूहांची क्षमता १०० वरून २५६ करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात कंपनीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी व्हॉट्सअॅपच्या २.१२.४३७ आणि त्याच्या पुढील आवृत्त्यांमध्ये समूह सदस्यांची संख्या २५६ झाल्याचे दिसत आहे. व्हॉट्सअॅप हे समाज माध्यमअनेक मित्र आणि कुटुंबांना एकत्र आणणारे असून या अॅपमध्ये सुरूवातीला ५० सदस्यांची क्षमता होती. पण ही समूहांची क्षमता कालांतराने १०० करण्यात आली. मात्र, आता ही क्षमताही वाढविण्यात आली असून ती २५६ करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2016 रोजी प्रकाशित
व्हॉट्सअॅपवर आता २५६ जणांचा समूह
या संदर्भात कंपनीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 09-02-2016 at 13:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp groups now support up to 256 members