मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून, या कामानिमित्त ब्लाॅक मालिका सुरू आहे. या कामासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी १० पर्यंत १० तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परिणामी, अनेक लोकल रद्द, तर काही लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नायर रुग्णालय विनयभंग प्रकरण : निलंबित डॉक्टराविरोधात आणखी १० विद्यार्थिनींच्या तक्रारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.४४ वाजता विरार – अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंत धावेल. रात्री ११:५५ वाजता अंधेरी – भाईंदर जलद वातानुकूलित लोकल रात्री ११.२५ वाजता बोरिवलीवरून चालवण्यात येईल. रात्री ८.२३ ची दादर – बोरिवली लोकल, रात्री १०.२४ ची चर्चगेट – बोरिवली लोकल, सायंकाळी ७.११ ची चर्चगेट – बोरिवली लोकल भाईंदरपर्यंत चालवण्यात येईल. रात्री ११.४० ची विरार – अंधेरी लोकल भाईंदरपर्यंत चालवण्यात येईल. रात्री १२.१६ ची चर्चगेट – बोरिवली लोकल, रात्री १२.३८ वाजेची चर्चगेट – बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येईल. रविवारी सकाळी ७.२५ ची विरार – वांद्रे लोकल, सकाळी ९.०५ ची विरार – बोरिवली लोकल, सकाळी १०.३० ची विरार – वांद्रे लोकल चर्चगेटपर्यंत चालवण्यात येईल.