मुंबईमध्ये गुरूवारी गोवरचे १० रुग्ण सापडल्याने गोवरच्या रुग्णांची संख्या ५६३ इतकी झाली आहे. तसेच १३ संशयित गोवरचे रुग्ण सापडल्याने संशयित रुग्णांची संख्या ५ हजार ४७५ इतकी झाली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गुरूवारी २३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून, १८ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा- Deven Bharti : “मुंबई पोलीस दलात कुणीही सिंघम नाही.. आम्ही सगळे..”

मुंबईच्या १६ प्रभागांमध्ये गोवरचे उद्रेक झाला असून मुंबई महानगरपालिकेने या सर्व विभागांमध्ये विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार ६ ते ९ महिने वयाेगटातील ५ हजार २९३ बालकांपैकी २५७३ बालकांना म्हणजेच ४८.६१ टक्के बालकांना गोवर-रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. तसेच ९ महिने ते पाच वर्षे वयोगटातील लसीच्या विशेष मात्रेसाठी निश्चित केलेल्या २ लाख ६० हजार ७३९ बालकांपैकी आतापर्यंत १ लाख ९ हजार १५३ बालकांचे म्हणजे ४१.६० टक्के बालकांचे लसीकरण झाले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांपैकी ७६ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, नऊ रुग्णांना प्राणवायू लावण्यात आला आहे. अतिदक्षता विभागात सहा रुग्ण असून, एक रुग्ण जीवन रक्षक प्रणालीवर आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.