– राजू परुळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविद्यालीयन तरुणींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या नराधमाला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर आरोपीने आतापर्यंत आपण ११ मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा खुलासा केला आहे. माझ्यावर प्रेम केले नाही, तर मी विष पिऊन आत्महत्या करीन असे भावनिक मेसेज पाठवून आरोपी तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. यानंतर त्यांच्याशी शरिरसंबंध ठेवत तसंच नग्न फोटो काढून ब्लॅकमेल करत असे. एका पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने आतापर्यंत महाविद्यालयातील ११ मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. अटक आरोपीचे नाव गौरव मोरे असून तो मुंबईच्या दादर नायगाव परिसरात राहणारा आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिकत असलेला आरोपी गौरव मोरे हा महाविद्यालयातीलच मुलींना धमकावून आत्महत्या करेन असं सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, आणि ब्लॅकमेल करायचा. विशेष म्हणजे आरोपी तरुणींवर महाविद्यालयाच्या आवारातच अत्याचार करायचा. ब्लॅकमेल करत असताना तो तरुणींकडून पैसेही उकळत होता.

आरोपीने महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या एका तरुणीलाही आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्यावर अत्याचार करून ब्लॅकमेल करत ५० हजार रुपयांची मागणी केली होती. ठाण्यात राहणाऱ्या या तरुणीने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केल्यानंतर आरोपी गौरव मोरेचा भांडाफोड झाला. तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीचे बिंग फुटले. ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपी गौरव मोरेला अटक करून त्याच्याविरोधात खंडणी, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 mumbai college girls sexually assault accused arrested by thane police
First published on: 31-08-2018 at 21:35 IST