मुंबई : पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी – गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच जलद मार्गावरील लोकलला फलाट उपलब्ध नसल्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधी मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट – बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार असून तेथूनच चर्चगेटकरिता चालविण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : सुट्टीच्या दिवशीच परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांचे ‘आयडॉल’ला गाऱ्हाणे

दुपारी १.५२ ची सीएएसएमटी – गोरेगाव लोकल रद्द करण्यात आली आहे. ब्लॉकपूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी गोरेगाव रात्री ११.५४ वाजता सुटेल आणि रात्री ११.४९ वाजता गोरेगावला पोहोचेल. अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री ११.०६ वाजता सुटेल आणि रात्री १२.०१ वाजता सीएसएमटी येथे पोहचेल.

– ब्लॉक कालावधीत वांद्रे-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

– चर्चगेटवरून दुपारी १२.१६ वाजता सुटणारी चर्चगेट – बोरिवली लोकल आणि दुपारी २.५० वाजताची चर्चगेट – बोरिवली लोकल विरारपर्यंत धावेल.

– बोरिवलीवरून दुपारी १.१४  आणि दुपारी ३. ४० वाजता सुटणारी बोरिवली – चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी विरार – चर्चगेट दुपारी १.४५  आणि दुपारी ४.१५ वाजता दोन अतिरिक्त जलद लोकल धावतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

–  ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल / एक्स्प्रेस १० ते १५  मिनिटे विलंबाने धावतील. तसेच राम मंदिर स्थानकावर अप आणि डाऊनला कोणतीही लोकल उपलब्ध नसेल.