विविध क्षेत्रांतील १५० मान्यवरांचा अख्तर, शाह यांना पाठिंबा

शाह यांनी  व्यक्त के लेल्या मतांवरून मुस्लीम समाजाकडूनच त्यांना टीके चे लक्ष्य करण्यात आले होते.

मुंबई: अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीसंदर्भात बोलताना प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी जी स्पष्ट निरीक्षणे नोंदवली, त्यावरून अख्तर यांना संघ तसेच भाजपप्रणीत संघटनांकडून  रोषाला सामोरे जावे लागते आहे. त्यांना ज्या प्रकारे धमकावले जाते आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील १५० मान्यवर विचारवंतांनी  नाराजी व्यक्त के ली आहे.

त्यांचा मताधिकार जपला गेला पाहिजे, याबद्दल आग्रही असल्याचे नमूद करत जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद के ले आहे. तिस्ता सेटलवाड, अमिर रिझवी, आनंद पटवर्धन, अंजुम राजाबाली अशा मान्यवरांचा यात सहभाग आहे.

ख्रिश्चन, शीख, हिंदू असो वा मुस्लीम असोत, जगभरातील सर्व उजव्यांच्या विचारसरणीत समानता आहे. कु टुंबात वा समाजात स्त्रियांचे त्यांच्या दृष्टीने काय स्थान आहे, याबाबतीत त्यांची मते जाहीरपणे व्यक्त के ली जातात तेव्हा त्यांची ही कडवी मानसिकता अधिकच स्पष्ट होते. तालिबान्यांची मानसिकता अधिकच हिंसक आणि टोकाची आहे आणि गेल्या काही वर्षांत संघ परिवाराकडून होणाऱ्या अशा हिंसक घटनांकडेही ‘हिंदू तालिबान’ म्हणूनच पाहिले जाऊ लागले आहे, इतक्या स्पष्ट शब्दांत या पत्रात सद्य:परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. जावेद अख्तर यांच्या मुलाखतीवरून उठलेला वादंग आणि त्याचवेळी नसीरुद्दीन शाह यांच्या जुन्या मुलाखतीची चित्रफित समाजमाध्यमांवर येणे या दोन्ही घटनांमधील योगायोग दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही, असेही त्यांनी नमूद के ले आहे.

शाह यांनी  व्यक्त के लेल्या मतांवरून मुस्लीम समाजाकडूनच त्यांना टीके चे लक्ष्य करण्यात आले होते. भारतीय इस्लाम हा जगभरातील इस्लामी धर्मविचारांपेक्षा वेगळा आहे. आपल्याला आपल्या धर्मात आधुनिक विचार आणि सुधारणा हव्यात की कर्मठ धर्मविचार वाढवायचा आहे? याचा विचार व्हायला हवा, असे मत शाह यांनी व्यक्त के ले होते.

शाह यांचे हे वक्तव्य आणि जावेद अख्तर यांनी व्यक्त केलेली मते यातून महत्त्वाचे विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न के ला जात असल्याकडे लक्ष वेधत त्यांना आपला पाठिंबा असल्याची भूमिका या विचारवंतांनी घेतली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 150 dignitaries from various fields support javed akhtar naseeruddin shah zws