मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत २० जण होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस बाटल्याचा स्फोट झाला. या भीषण स्फोटामध्ये तब्बल २० स्थानिक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली असून, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

मागील काही दिवसांपासून स्फोट झालेल्या खोलीमध्ये गॅस लीकेजचा वास येत होता. रविवारी सकाळी वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक शोध घेत गेले असता अचानक स्फोट झाला. या भयंकर स्फोटात परिसरातील तब्बल २० जण आगीत होरपळून जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी केईएम व ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटना घडली त्या ठिकाणी विवाहाची तयारी सुरू होती. स्वयंपाक तयार करण्याच काम सुरू असतानाच गॅस लीकेजचा वास येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे लोकांनी शोधाशोध सुरू केली होती. या स्फोट नवरीचे वडीलही जखमी झाले असल्याची माहिती आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 people injured in a cylinder blast in lalbaug area bmh
First published on: 06-12-2020 at 09:52 IST