पाच लाखांहून अधिक प्रवाशांवर कारवाई

मुंबई: मध्य व पश्चिाम उपनगरीय रेल्वे मार्गावर एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत ५ लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.   कारवाईतून २१ कोटी रुपयांहून अधिकची दंडाची रक्कम वसूल केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असल्याने लोकलमधून अनेकजण नाईलाजास्तव विनातिकीट प्रवासाचाही प्रयत्न करत होते. तर काहीजण अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र बाळगून प्रवास करु लागले. असे प्रवासी सापडताच त्यांच्यावर तिकीट तपासनीसांकडून विनातिकीट प्रवासी म्हणून कारवाई करण्यात आली. एप्रिल २०२१ ते सप्टेंबर  २०२१ पर्यंत ५ लाख २७ हजार ६६३ विनातिकीट लोकल प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यात मध्य रेल्वेवरील ३ लाख २० हजार १९९ प्रवाशांवर के लेल्या कारवाईतून ११ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल क रण्यात आला. तर पश्चिाम रेल्वेवर २ लाख ७ हजार ४६४ विनातिकीट उपनगरीय प्रवासी पकडताना त्यांच्याकडून ९ कोटी ४२ लाख रुपये दंड प्राप्त के ल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाचही विभागात याच कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या एकू ण १२ लाख ४७ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई क रण्यात आली असून ७१ कोटी २५ लाख रुपये दंड वसूल के ल्याची माहिती देण्यात आली. यात मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर ३ लाख २० हजार १९९ विनातिकीट प्रवासी आढळले आहेत.