मुंबई सेंट्रल ते विरार यांदरम्यान लवकरच कामे सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आबालवृद्धांबरोबरच सामानसुमानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर आणखी २७ स्वयंचलित जिने बसविले जाणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या आठ स्थानकांवर २३ स्वयंचलित जिने कार्यरत आहेत. आता या आठ स्थानकांबरोबर आणखी पाच स्थानकांवर हे सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. यासाठी ३० कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सरकत्या जिन्यांची संख्या ५० वर पोहोचणार आहे.

एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडण्याच्या घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाने मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये सरकते जिने बसवण्याची योजना आखली होती. या योजनेनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात आले आहेत. तसेच रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार आणखी स्थानकांवर सरकते जिने बसणार आहेत. पश्चिम रेल्वेवर या योजनेअंतर्गत ५० सरकते जिने बसवण्याची योजना पश्चिम रेल्वेने आखली होती. त्यापैकी २३ सरकते जिने याआधीच बसवण्यात आले असून ते कार्यरत झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात २७ सरकत्या जिन्यांसाठी निविदा मागवून काम सुरू करण्यात येणार आहे.

यात मुंबई सेंट्रल, दादर, विलेपार्ले, मालाड, बोरिवली, मीरारोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार या स्थानकांचा समावेश आहे. याआधी पश्चिम रेल्वेने दादर, पार्ले, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, वसई रोड आणि नालासोपारा या स्थानकांवर सरकते जिने बसवले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27 more escalator on western railway
First published on: 17-09-2016 at 03:13 IST