मुंबई : लालबाग परिसरातील एस. एस. राव मार्गावरील क्षीरसागर हॉटेलनजीकच्या तीन मजली इमारतीत मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १० वर्षांच्या दोन मुलांसह चारजण जखमी झाले असून रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. चौघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा >>> अद्याप ३८ हजार गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची म्हाडाला प्रतीक्षा; आतापर्यंत एक लाख १२ हजार कामगारांची कागदपत्रे सादर, ९८ हजार कामगार पात्र

लालबाग येथील मेघवाडीमधील एका तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक २६ मध्ये मंगळवारी पहाटे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेत कुंदा राणे (४८), अथर्व राणे (१०), वैष्णवी राणे (१०), अनिकेत डिचवलकर (२७) हे होरपळले. रुग्णांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या कस्तुरबा आणि मासिना रुग्णालयात हलविण्यात आले. कुंदा, अथर्व आणि वैष्णवीला कस्तुरबा रुग्णालयात, तर अनिकेतला मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिकेतची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.