कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतूक उत्पन्नात ४० कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर २०१२ या काळात २२६ कोटी रुपये कोकण रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळाले होते. तर यंदा याच कालावधीत हा आकडा २६७.१५ कोटी रुपये एवढा वाढला आहे.
मध्य, पश्चिम अशा विविध रेल्वेंनी कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी सुट्टीविशेष, गणपती विशेष आणि नाताळ व नववर्ष विशेष गाडय़ा चालवण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.
गेल्या वर्षी कोकण रेल्वेमार्गावर फक्त ५३४ विशेष गाडय़ा धावल्या होत्या. त्यामुळे यंदा केवळ कोकण रेल्वेच्या महसुलातच नाही, तर गाडय़ांमध्येही ३१० एवढी भर पडली आहे. यंदा या मार्गावर एकूण ८४४ विशेष फेऱ्या धावल्या. त्यामुळे अंदाजे १२ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2013 रोजी प्रकाशित
कोकण रेल्वेच्या उत्पन्नात ४० कोटींची वाढ
कोकण रेल्वेच्या प्रवासी वाहतूक उत्पन्नात ४० कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर २०१२ या काळात २२६ कोटी रुपये कोकण रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळाले होते. तर यंदा याच कालावधीत हा आकडा २६७.१५ कोटी रुपये एवढा …

First published on: 28-12-2013 at 03:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 crore increased in konkan railway revenue