ठाणे शहरातील कासार वडवली परिसरात कच-याच्या ढिगा-यामध्ये बुधवारी ५ दिवसांचं अर्भक आढळून आलं. कच-याच्या ढिगा-यातून ५ वर्षाच्या अर्भकाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर पोलिसांच्या मदतीने या अर्भकाला लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. हे मुलीचे अर्भक असून तपासणीनंतर तिची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांतर्फे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, कासार वडवली पोलिसांतर्फे अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्भकाला कचरा पेटीत कुणी टाकले यासंबंधी तपास सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2013 रोजी प्रकाशित
कच-याच्या ढिगा-यामध्ये ५ दिवसांचं अर्भक सापडलं
ठाणे शहरातील कासार वडवली परिसरात कच-याच्या ढिगा-यामध्ये बुधवारी ५ दिवसांचं अर्भक आढळून आलं.

First published on: 12-09-2013 at 12:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 days old girl child found in garbage