मुंबई: वांद्र्यात पाच मजली इमारत कोसळली; पाच जण अडकल्याची भीती; बचावकार्य वेगात सुरू

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.

मुंबईतल्या वांद्रे पूर्व भागातली एक पाच मजली इमारत आज कोसळली. यामध्ये पाच जण अडकून पडल्याची भीती महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबद्दलची माहिती दिली आहे.

वांद्रे पूर्व परिसरातल्या बेहराम नगरमधली एक पाच मजली इमारत आज कोसळली. याबद्दलची माहिती मिळतात महापालिकेने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरूवात केली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.

या इमारतीत पाच जण अडकून पडल्याची भीती महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीची माहिती दिली आहे. तसंच घटनास्थळाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 5 floor building collapsed in behram nagar bandra east mumbai vsk

Next Story
निर्भया पथके कायद्याचा वचक निर्माण करतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास; तर गृहमंत्री म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी