मुंबई : पवई परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५७ जणांना अटक त्यात सहा महिलांचा समावेश आहे. याशिवाय १५ महिलांना नोटीस देण्यात आली आहे.

या जमावाने तेथील महिलेच्या घरावरही हल्ला केल्याचा आरोप असून त्यात एक तीन वर्षांची मुलगी जखमी झाली. त्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगिगतले. पवईच्या जय भीम नगर भागात पालिकेच्या एस विभाग कार्यालयामार्फत अतिक्रमण हटवण्याबाबत ३ जून रोजी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार पालिका अधिकारी, कर्मचारी ६ जून रोजी कारवाई केली. यासाठी पवई पोलिसांकडून पालिकेने मागितलेला बंदोबस्तही पुरविण्यात आला होता. मात्र या वेळी पोलिसांवरच स्थानिकांनी दगडफेक करायला सुरुवात केली. दगडफेकीच्या वेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी दगडफेक सुरूच ठेवल्याने पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

notorious chhota rajan granted bail by bombay high court
जया शेट्टी हत्या प्रकरण;कुख्यात छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन;व्यावसायिक अन्य प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंगातच मुक्काम
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Pune driving opposite direction, driving in the opposite direction,
पुणे : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या बेशिस्तांवर कडक कारवाई
FASTAG, road tax Mumbai, traffic jam Mumbai,
दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी
280 laptops worth of one crore are stolen from the warehouse of reputed company
नामांकित कंपनीच्या गोदामातून एक कोटींचे २८० लॅपटॉप चोरी, वाघोली पोलिसांकडून कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल
Lakadganj police station is in discussion due to the controversial affairs
नागपूर : गंगाजमुनातील वारांगना; पोलिसांचा छापा अन् ग्राहकांची पळापळ…
Jai Bhim Nagar, huts in Jai Bhim Nagar,
मुंबई : जयभीमनगर प्रकरण; झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
महिला सशक्तीकरण अभियानास उपस्थिती

हेही वाचा >>>मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द; जलाशयाची केवळ दुरुस्ती होणार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

महिलेच्या घरावर हल्ला

याशिवाय परिसरात राहणाऱ्या महिलेने बांधकाम व्यवसायिकासोबत समझोता केल्याच्या आरोपाखाली जमावाने आशा चौरे या महिलेच्या घरावरही दगडफेक केली. त्यात चौरे यांच्या बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीला दगड लागल्यामुळे ती जखमी झाली. याप्रकरणी पवई पोलिसांनी २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दगड व लाठ्याकाठ्यांनी महिलेच्या घरावर हल्ला केला असून त्या हस्तगत करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.