मुंबईः अवघ्या २० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. औषधोपचारानंतरही पीडित मुलीचा त्रास कमी न झाल्यामुळे आईने तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी पीडित मुलीच्या शेजारी राहणारा आहे. पीडित मुलीला मूत्रविसर्जनास त्रास होत असल्यामुळे कुटुंबियांनी तिला डॉक्टरांकडे नेले होते.

हेही वाचा >>> नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औषधोपचार केल्यानंतरही मुलीचा त्रास कमी झाला नाही. अखेर मुलीच्या आईने तपासणी केली असता तिच्या जननेंद्रियांजवळ जखम असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. आरोपीने २० / २१ जानेवारी रोजी दरम्यान पीडित मुलीला घरी नेले होते. त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. तक्रारीनंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच रविवारी रात्री पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली.