राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या जंतनाशक औषधाच्या गोळ्या उत्कृष्ट दर्जाच्या असल्याचा खुलासा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेला आहे. मात्र जंतनाशक गोळ्यांबाबत घेतलेल्या आक्षेपांबाबत शनिवारी आरोग्य सेविकांची वॉर्ड प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा- प्रतिबंधित गोळ्यांच्या तस्करी प्रकरणी आणखी एकाला अटक

राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम अंतर्गत, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने दिनांक १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ या आठवड्याच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय व शाळा बाह्य मुला-मुलींना जंतनाशक औषधाची गोळी (Albendazole) चे वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत १ वर्ष ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे.

हेही वाचा- उमेदवारी अर्ज दाखल ; ऋतुजा लटके, मुरजी पटेल यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

या गोळ्याचा लगेचच चुरा होत असल्याचे आढळल्यामुळे आरोग्य सेविकांनी आक्षेप घेतला होता. मात्र गोळ्यांबाबत नागरिकांनी विश्वास बाळगावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- बालकांसाठी बी जे वाडिया रुग्णालयाची ‘तितली’ पँलेएटिव्ह होम केअर सेवा सुरू

आरोग्य सेविकांनी या गोळ्यांबाबत घेतलेला आक्षेप प्रशासनाने खोटा ठरविला आहे. मात्र गोळ्या घेणाऱ्या मुलांना धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य सेविकांनी आक्षेप घेतला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आरोग्य सेविकांच्या संघटनेने शनिवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे संघटनेतर्फे कळवण्यात आले आहे.