मुंबईः माटुंगा उ्डडाणपुलावर मोटरगाडीने पेट घेतली. गाडीने पेट घेतला त्यावेळी चालक व एक महिला मोटरगाडीत होती. सुदैवाने दोघांनाही कोणती इजा झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पण घटनेनंतर रस्त्यावरील वाहतुक काही काळ बंद करण्यात आली होती.
त्यामुळे दक्षिण वाहिनीवरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.