मुंबई : वडाळा येथे पार्किंगची परांची कोसळल्याची घटना घडली. बरकत अली नाका येथे पार्किंगची धातूची संपूर्ण परांची कोसळल्याची घटना घडली. श्री जी टॉवर या इमारतीची ही परांची जवळच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळली. वादळी वाऱ्यामध्येही ही धातूची परांची अक्षरश: उडत जमिनीवर आदळली.

हेही वाचा – पाऊस, अपघातांमुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम

हेही वाचा – मुंबई : वादळी वाऱ्यामुळे सागरी किनारा मार्गाचा दुसरा गर्डर बसवण्याचे काम लांबणीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुर्घटनेत आठ ते दहा गाड्या दबल्या गेल्या. तर एका गाडीत असलेली एक व्यक्ती जखमी झाली. वडाळ्यातील गणेश सेवा झोपडपट्टीचे झोपु योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येते होते. या प्रकल्पातील पुनर्वसित आणि विक्रीसाठीच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून पार्किंग टॉवरचे काम सुरू होते. ३० ते ४० मीटर उंच असे पार्किंग टॉवर येथे उभारण्यात येते होते. त्यासाठी ३० ते ४० मीटर उंच स्टीलचा ढाचा उभारण्यात आला होता. त्यावर काँक्रीटीकरण करण्यात येणार होते. मात्र, सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यात हा टॉवर कोसळला. या दुर्घटनेनंतर झोपु योजनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली? टॉवरचा ढाचा मुजबूत नव्हता का? या आणि अन्य बाबींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती झोपुतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.