मुंबई : करोनाचे विषाणू सातत्याने स्वत:मध्ये बदल घडवून आणत आहेत. त्यामुळे नवनव्या विषाणूंची उत्पत्ती होत आहे. करोनाचा नवा विषाणू असलेल्या ‘जेएन १’चे रुग्ण चीन आणि अमेरिकेमध्ये सापडत असून त्याचा पहिला रुग्ण भारतामधील केरळमध्ये सापडला आहे. भारतीय सार्स करोना जिनोमिक कर्न्‍सोटियम अंतर्गत सुरू असलेल्या करोना चाचणीदरम्यान ७९ वर्षीय महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे आढळले.

केरळमधील थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी एका वृद्ध महिलेला ‘जेएन १’ची बाधा झाल्याचे निदर्शनास आले.या महिलेची १८ नोव्हेंबर रोजी करोनाविषयक (आरटीपीसीआर) चाचणी करण्यात आली. तिला सौम्य प्रकारची लक्षणे आढळली होती. तसेच तिला थोडासा अशक्तपणाही जाणवत होता. मात्र आता तिची प्रकृती उत्तम असल्याची मााहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव बहल यांनी दिली.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

हेही वाचा >>>राजावाडी रुग्णालय सुपरस्पेशालिटी होणार; दोन वर्षांत विस्तारीकरण पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

‘जेएन १’ हा करोनाचा उपप्रकार ‘बीए.२.८६’ या गटातील आहे. सामान्यत: पिरोला म्हणून ओळखला जातो. करोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण सापडलेल्या परिसरातील परिस्थितीचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून निरीक्षण करण्यात येत असून, राज्य सरकार परिस्थितीचा आढावा घेत आहे. तसेच करोनाच्या या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मॉक ड्रिल करण्यात येत आहेत. गेल्या काही आठवडय़ांपासून केरळमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यातील बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून, ते घरी राहूनच बरे झाले आहेत.

जगभरामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी डिसेंबरच्या सुरुवातील अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध देशांमध्ये करोनाच्या उपप्रकाराची बाधा झालेले रुग्ण कमी – अधिक प्रमाणात आढळत आहेत.

‘काळजी करण्याचे कारण नाही’

‘‘केरळमध्ये आढळलेल्या ‘कोविड-१९’च्या विषाणूचा ‘जेएन.१’ या उपप्रकार चिंताजनक नाही,’’ असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी सिंगापूर विमानतळावर तपासणी केलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये हा उपप्रकार सापडला. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे, काळजीचे कारण नाही, असे जॉर्ज यांनी सांगितले.