दीडशे कोटी रुपये किंमतीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीला मदत करणाऱ्या आरोपीला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) गुडगाव येथून अटक केली. सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीत चीन आणि दुबईतील नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचा- ट्विटरने टिकची संकल्पना चोरल्याचा मुंबईस्थित पत्रकाराचा आरोप; मस्क आणि ट्विटरवर कारवाईची मागणी

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

आरोपी नवनीत सिंह हा सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंधीत आहे. या टोळीशी संबंधीत दोघांना गेल्या वर्षी मे महिन्यात डीआरआयने अटक केली होती. त्याप्रकरणी सात कोटी रुपये किमतीचे १६ किलो सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने हाँगकाँगमधून आणले होते आणि एअर कार्गोद्वारे भारतात आणले जात होते. आरोपी इलेक्ट्रिक ब्रेकर यंत्रात दडवून सोन्याची तस्करी करीत होते.

डीआरआयच्या तपासानुसार सिंह या टोळीचा प्रमुख सदस्य आहे. त्याने तस्करी करून आणलेल्या सोन्याची वाहतूक आणि ते लपवण्यासाठी मदत केली होती. तसेच इतर सदस्यांना लपवण्यासाठीही तो मदत करायचा. डिसेंबर २०२१ मध्ये सिंह मुंबईत आला होता आणि त्याने कांदिवली येथे सदनिका आणि गोरेगावमध्ये एका आरोपीसाठी दुकानाची व्यवस्था केली होती. सिंह याने एका आरोपीच्या नावावर मोटरगाडीही खरेदी केली होती. याच वाहनातून तस्करीचे सोने मुंबई एअर कार्गो संकुलामधून कांदिवली सदनिकेपर्यंत नेण्यात येणार होते. इतर आरोपी या सदनिकेत यंत्रातून सोने बाहेर काढणार होते.

हेही वाचा- “एकाने मागून स्टंपने हल्ला केला, अन् दुसऱ्याने…”; संदीप देशापांडेंनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

सिंहने सोन्याच्या तस्करीसाठी हरियाणातील गुडगाव आणि मानेसर येथे अशाच प्रकारे सदनिका, गोदामे आणि वाहनांची व्यवस्था केली होती. आरोपींनी किमान २० वेळा सोन्याची तस्करीत केली असून त्यात सिंहने मदत केल्याचा आरोप आहे. या टोळीचा म्होरक्या दुबईतील असून तो सिंहला पैसे पाठवत असल्याचा आरोप आहे. याशिवाय सिंह चीनमधील नागरिकांच्याही संपर्कात आहे. तेही या सोन्याच्या तस्करीत सहभागी आहेत.

हेही वाचा- मुंबई ते गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ लवकरच, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे आमदारांना आश्वासन

यापूर्वी या टोळीने १५० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे. बेकायदेशीर सोन्याच्या विक्री आणि खरेदीसाठी ते हवाला रॅकेटचा वापर करीत असल्याचा डीआरआयला संशय आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी शुक्रवारी सिंहला अटक करण्यात आली. या टोळीचे काही सदस्य दिल्लीत सक्रीय असल्याचा डीआरआयला संशय आहे.