मुंबई : राजकीय पक्षातील फूट आणि अन्य पक्षांत विलीन होणे हा सध्याच्या राजकीय संस्कृतीचा भाग बनला असून हा एक प्रकारे मतदारांचा विश्वासघात आहे. त्यामुळे, पक्षांतील फूट आणि विलीनीकरणाला संरक्षण देणारा राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील चौथा परिच्छेद रद्द करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक विश्वस्त मीनाक्षी मेनन यांनी जनहित याचिका करून, पक्षातील तूट आणि विलीनीकरणाला संरक्षण देणारी राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील चौथा परिच्छेद रद्द करण्याची मागणी केली आहे.