मुंबई: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग; एका महिलेचा मृत्यू | A woman died in a raging fire in a garment factory mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग; एका महिलेचा मृत्यू

धारावीच्या नव्वद फूट रोडवरील साई हॉटेलच्या समोरील अशोक मिल कंपाउंडमधील तळमजल्यावरील कपड्यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली.

dead
सांकेतिक फोटो

धारावीच्या नव्वद फूट रोडवरील साई हॉटेलच्या समोरील अशोक मिल कंपाउंडमधील तळमजल्यावरील कपड्यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या गाळ्यातील कपड्यांचा साठा, विद्युत यंत्रणा व उपकरणांमुळे ही आग पसरत गेली. आगीचे वृत्त समजताच मुंबई अग्निशमन दलाच्या पाच मोठ्या गाड्या, पाण्याचे तीन टँकर आणि दोन दुचाकी घटनास्थळी दाखल झाल्या.

हेही वाचा >>>नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी शरीरावर थेट सराव, सरकारी रुग्णालयामध्ये प्रथमच अशी सुविधा

अशोक मिल कम्पाउंडमधील कपड्यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी आग लागली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थली धाव घेतली. इमारतीच्या तळमजल्यावरील स्नानगृहात एक महिला अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या महिलेची स्नानगृहातून सुटका केली. या महिलेला तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळानंतर या महिलेचा मृत्यू झाला. उषा लोंढे (६२) असे या महिलेचे नाव होते, अशी माहिती शीव रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांना दुपारी ३.०५ च्या सुमारास आग विझविण्यात यश आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 22:26 IST
Next Story
“जे गॅस सिलिंडर भरत असतील त्यांचं उत्पन्न जास्त असेल, त्यामुळे…”, अर्थसंकल्पावर बोलताना नारायण राणेंचं वक्तव्य