काही दिवसांपूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. अशातच युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवासेना नेते राहुल कनाल शिवसेनेत ( शिंदे गट ) जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राहुल कनाल शनिवारी ( १ जुलै ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच राहुल कनाल यांचं ट्वीट चर्चेत आलं आहे.

वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. यावरून राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत राहुल कनाल म्हणाले, “दु:ख होतंय! हे कोणी केलंय, सर्वांना चांगलं माहिती आहे. पण, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं, त्यांचं न ऐकता काढून टाकणं, हा अहंकार आहे.”

हेही वाचा : “शरद पवारांनी गुगली टाकली नसती, तर एखादे…”, संजय राऊत यांचं विधान

“तुम्ही मला हटवू शकता. मात्र, ज्यांनी रात्रंदिवस काम केलं, त्यांना हटवू शकत नाही. अहंकार काय असतो, हे सर्वांना माहिती झालं पाहिजे,” असं राहुल कनाल यांनी म्हटलं.

हेही वाचा : “मुलीला कोयता हल्ल्यातून वाचवलं याचा अभिमान, पण धाकधुकही, कारण…”, लेशपाल जवळगेच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या ट्वीटमध्ये राहुल कनाल म्हणतात की, “जय महाराष्ट्र!!! ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्या कार्यकर्त्यांना माझ्यामुळे सामना करावा लागत आहे. यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही त्याची सुरुवात केली आहे. धन्यवाद,” असे राहुल कनाल म्हणाले आहेत.