केंद्रातील यूपीए सरकारच्या महत्त्वाकांक्षी आधार कार्ड योजनेच्या शुभारंभासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नंदुरबार जिल्ह्य़ाची निवड केली होती. या पाठोपाठ १८ वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठीही ठाणे जिल्ह्य़ातील पालघरची निवड करून काँग्रेसने आदिवासी बहुल भागातील आपले वर्चस्व कायम राहील, याची खबरदारी घेतली आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत बालकांचा मृत्यू दर आणि कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. दरवर्षी या योजनेत २७ कोटी बालकांना लाभ होणार आहे. या योजनेच्या आरंभासाठी नंदुरबारऐवजी पालघरची निवड करण्यात आली. ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून लवकरच पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात येणार आहे. आदिवासी बहुल जिल्ह्य़ात काँग्रेसचे राजकीय वर्चस्व राहावे हा त्यामागचा उद्देश आहे. ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी आणि ग्रामीण भागात काँग्रेस संघटनात्मकदृष्टय़ा कमकुवत आहे. या जिह्यात चार खासदार आणि २४ आमदार आहेत़ पण कॉंग्रेसचा एक खासदार आणि आमदार निवडून आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2013 रोजी प्रकाशित
सोनियांकडून पुन्हा आदिवासी भागाची निवड!
केंद्रातील यूपीए सरकारच्या महत्त्वाकांक्षी आधार कार्ड योजनेच्या शुभारंभासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नंदुरबार जिल्ह्य़ाची निवड केली होती. या पाठोपाठ १८ वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठीही ठाणे जिल्ह्य़ातील पालघरची निवड करून काँग्रेसने आदिवासी बहुल भागातील आपले वर्चस्व कायम राहील, याची खबरदारी घेतली आहे.
First published on: 06-02-2013 at 04:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aboriginal area selected again by soniya