लोकल किंवा एक्स्प्रेस गाड्यांच्या दरवाजाजवळ उभे राहून करण्यात येणारा प्रवास धोक्याची घंटा ठरत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेतून प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहिलेल्या ७५ प्रवाशांना रुळांजवळील खांबाची धडक बसून अपघात झाला असून यापैकी २० प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरून आजघडीला दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. करोनापूर्वी हीच संख्या ४५ लाख होती. त्याव्यतिरिक्त सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांचीही भर पडते. लोकलमधून गर्दीच्या वेळी होणारा प्रवास काही वेळा प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. दरवाजाजवळ लटकून प्रवास करताना दुर्लक्ष झाल्याने रुळांजवळील खांबाला धडक बसून प्रवाशांचा अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच लोकल गाड्यांना गर्दी नसतानाही काही प्रवासी दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करीत असतात. त्यामुळेही अपघात होतात. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या दरवाजाजवळ काही प्रवासी विनाकारण उभे राहून प्रवास करतात आणि त्यामुळेही अपघात होतात.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके
mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका

हेही वाचा >>> मुंबई : महानगरपालिका आयुक्तांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांना दिली केवळ एका मिनिटाची भेट

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण ७५ प्रवाशांचे अपघात झाले आहेत. तीन वर्षांत या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यापैकी २० प्रवाशांचा मृत्यू आणि ५५ प्रवाशी जखमी झाले आहेत. एकूण ७५ अपघातांपैकी मध्य रेल्वे मुंबई विभागात सर्वाधिक ४७ अपघात झाले आहेत. तसेच मध्य रेल्वेवर अशा अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. कल्याण, सीएसएमटी, वाशी, वांद्रे, चर्चगेट लोहमार्ग पोलीस ठाण्यात सर्वाधिक अपघाताची नोंद झाली आहे.

प्रवाशांना जबर शाॅक लोकलच्या टपावर चढून स्टंट करणे, प्रवास करणेही प्रवाशांना महागात पडत आहे. लोकलच्या टपावर चढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पेन्टाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमुळे शाॅक लागून मृत्यू होत आहे किंवा ते जखमी होत आहेत. असा प्रवास करणाऱ्या २० प्रवाशांचा २०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये मृत्यू झाला असून २९ जण जखमी झाले आहेत.