अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यानंतर आता सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलीस रियाला सुशांतच्या आत्महत्येविषयी काही प्रश्न विचारु शकतात. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह मुंबईतील कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या रुग्णालयाला आज रियाने भेट दिली. ती रुग्णालयाच्या बाहेर असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त समजताच संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी हादरुन गेली. रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण मानली जाते. तिने काल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत शुटिंग मिस करते आहे असं तिने लिहिलं होतं. त्यानंतर काही वेळातच ही दुःखद बातमी समोर आली.
Mumbai: Actor and #SushantSinghRajput‘s friend Rhea Chakraborty visited Cooper Hospital, where his body has been kept, earlier today. She will be questioned by the Police in connection with the case. pic.twitter.com/SxE4jturor
— ANI (@ANI) June 15, 2020
कदाचित सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला पोलीस प्रश्न विचारण्याची, तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. रिया चक्रवर्ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे अशा सिनेमांधूनही काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येमुळे हिंदी सिनेसृष्टी हादरली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक कलाकारांनी सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.