‘मराठी चित्रपटसृष्टीत फारसे भयपट येत नाहीत. त्यामुळे मराठीत प्रेक्षकांना आवडेल अशा उच्चा दर्जाचा वास्तवाची अनुभूती देणारा भयपट करावा अशी इच्छा मनात ठेवून ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले’, असे अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी याने सांगितले. विराजसचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘व्हिक्टोरिया’ हा भयपट नुकताच राज्यभरात प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : सेटवर पोहोचताच वाढदिवसादिवशी असं काही घडलं की निवेदिता सराफ यांच्या भावना अनावर, म्हणाल्या…

दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात भयपट निवडण्यामागचे कारण उलगडताना तो म्हणतो, ‘मी स्वत: अनेक भयपट पाहातो. मला प्रचंड भीती वाटेल असाच चित्रपट मला प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता.’ ‘माझा होशील ना’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि ‘हॉस्टेल डेज’, ‘माधुरी’, ‘हॉर्न ओके प्लीज’ अशा चित्रपटातून विराजसने उत्तम अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आता ‘व्हिक्टोरिया’च्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात वाटचाल सुरू केली आहे.

हेही वाचा- “मी गरोदर होते, तेव्हा अशोक…” निवेदिता सराफ यांनी सांगितले लग्नानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्यामागचे कारण

अभिनयानंतर लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रातही त्याची रुची वाढत गेल्याने त्याने पहिल्यांदा नाटक दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या नाटकाची गंमत त्याने सांगितली. ‘मी माझ्या जीवनातील पहिले नाटक दिग्दर्शित केले तेही भयनाट्य होते. ‘ॲनाथमा’ असे त्या नाटकाचे नाव होते आणि दिग्दर्शनासोबत मी त्यात अभिनयही करत होतो. हे भयनाट्य रंगभूमीवर सादर करत असताना प्रेक्षकांना हा नाट्यप्रकार आवडतो हे मी जवळून अनुभवले होते’, असे त्याने सांगितले. मात्र ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे कथालेखन सुरू असताना ती रहस्यमय शैलीत लिहिली गेली होती, नंतर पटकथा लेखन करताना हा एक उत्कृष्ट भयपट होऊ शकतो असे वाटल्यानेच त्या पध्दतीने चित्रपटाच्या पटकथेची मांडणी करण्यात आल्याचे विराजसने सांगितले.

हेही वाचा- “स्टार्स चित्रपटातील माझे सीन्स छाटायचे कारण…” कॉमेडी किंग जॉनी लिवर यांचा खुलासा

सलग वीस दिवस स्कॉटलंडमध्ये तेही कडाक्याची थंडी असताना चित्रीकरण पूर्ण करून आणि कमीत कमी खर्चात उत्तम व्हीएफएक्स साधून हा चित्रपट केला असल्याचे विराजसने सांगितले. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor director virajas kulkarni explains why he decided to direct a horror film mumbai print news dpj
First published on: 10-01-2023 at 18:41 IST