अभिनेता विशाल ठक्करने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका टीव्ही अभिनेत्रीने केला आहे. विशालच्या विरुद्ध बलात्कारासंबंधीत कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी सांगितले. मिळालेल्या वृत्तानुसार, आज सकाळी विशालला पोलिसांनी अटक केल्याचे कळते.
विशालने त्याच्या राहत्या घरी आपल्यावर बलात्कार केल्याची नोंद टीव्ही अभिनेत्रीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. याव्यतिरीक्त कोणतीही अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. विशालने ‘चांदनी बार’, ‘टॅंगो चार्ली’ या चित्रपटांसह ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘गीत हुई सबसे पराई’, ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकांमध्येही काम केले आहे.
बलात्कारप्रकरणी अभिनेता विशाल ठक्करला अटक
अभिनेता विशाल ठक्करने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका टीव्ही अभिनेत्रीने केला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 19-10-2015 at 16:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor vishal thakkar booked on charges of raping tv actress