मुंबई : उन्हाळी सुट्ट्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ सीएसएमटी- करमळी-सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी धावणार आहे.

गाडी क्रमांक ०११५१ सीएसएमटी ते करमाळी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमळीला येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी करमळीवरून दुपारी १:१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष रेल्वेगाडी

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता करमळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० करमळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीवरून दुपारी २.३० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण १९ डबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष रेल्वेगाडी

गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी ३ एप्रिल ते २९ मेपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी ४ वाजता धावेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी ५ एप्रिल ते ३१ मे पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी रात्री १२.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी सुरतकल, मंगळुरु, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनुर, त्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कर, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील.