शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर दगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे आता राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच हे चिन्ह गोठवण्याचं महापाप केलं – भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाला आहे. परंतु माझ्या समोर आणखी एक आलं आहे की, काल रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या आसपास तिथली पोलीस सुरक्षा, स्थानिक सुरक्षा काढली गेली आणि बरोबर एक-दोन तासानंतर हा हल्ला झालेल आहे. इथे कुठे काही या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का? कुठंतरी यंत्रणा यामागे आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हे भ्याड हल्ले आहेत. राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप, टीका, टिप्पणी होत असते पण असे कोणी नसताना घरावर हल्ले, पोलीस संरक्षण काढून घेणं. काल राजन विचारेंची सुरक्षाही कमी केली आहे. हे कुठंतरी यंत्रणेचा गैरफायदा घेणे, दुरुपयोग करणे हे समोर येत आहे.”

हेही वाचा : बच्चू कडूंच्या टीकेला रवी राणांकडून प्रत्युत्तर; म्हणाले, “मी किराणा वाटतो तू….”

याशिवाय “ज्या प्रश्नावर उत्तर देता येत नाही. महाराष्ट्रसाठी, सामान्य माणसासाठी जो बोलतोय त्याच्या प्रश्नांना उत्तर नसेल, महागाईवर उत्तर नसेल, तर जो प्रश्न विचारतोय त्याच्यावर चौकशी लावा, हल्ला करा, त्याला आत टाका. कधी कोणत्या मिरवणुकीत गोळीबार होतो. तर कुठे कार्यालय फोडलं जातं. पण कार्यालाय फोडणाऱ्या आमदारावर, गद्दारावर काही कारवाई होत नाही. केवळ आम्ही समज देऊ असं सांगितलं जातं. मला वाटतं या राज्याचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधी गेलं नव्हतं. आपल्या राज्यात कायदा, सुव्यवस्थेची कधीही एवढी वाट लागली नव्हती. मात्र घटनाबाह्य सरकार असल्याने या सगळ्या गोष्टी होत आहेत.” असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray reacted to the incident of attack on bhaskar jadhavs house msr
First published on: 19-10-2022 at 15:31 IST