शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी आज(बुधवार) मुंबईत सभेत बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवाय, महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग आदींकडून होत असलेल्या कारवायांवरूनही भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं मात्र त्यांच्यावर टीका, टिप्पणी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेवर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भास्कर जाधव म्हणाले, “आमचे विधीमंडळातील सहकारी वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस दिली. मात्र तिथले स्थानिक लोक सर्वकाही विसरून वैभव नाईकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. अशाचप्रकेर राजन विचारेंवर जो अन्याय होतोय, त्याला विरोधासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेने, संयमीपणे आणि नियोजबद्धरित्या शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं. परंतु सातत्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल समाजात शंका कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं. विविध पातळीवर टीका, टिप्पणी आणि आरोप करणं, अशा पद्धतीचं काम सुरू होतं.”

हेही वाचा : बच्चू कडूंच्या टीकेला रवी राणांकडून प्रत्युत्तर; म्हणाले, “मी किराणा वाटतो तू….”

याशिवाय “आपली धनुष्यबाण ही निशाणी गोठली, शिवसेना हे नावही गोठवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालं. आपल्या शिवसेनेला सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालेलं आहे. उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या, तशाचप्रकारे एक सामान्य शिवसैनिक म्हणून मीही शुभेच्छा दिली. त्यांना सांगितलं, शिवसेना नाव गोठवण्याचा प्रयत्न झाला याचं दु:ख तर आहेच, शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यात असेलली धनुष्यबाण ही निशाणी, जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केलं, याचं दु:ख तर तुम्हाला आहेच. पण मला असं वाटतं नियतीने तुमच्यासाठी नवीन दार उघडलेलं आहे, की उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने आता जे काही शिवसेनेचं बरं वाईट होईल. ते तुमचं असेल. यासाठी तुम्हाला नवीन संधी दिलेली आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तुमच्या नेतृत्वात नवीन शिवसेना उभी करावी लागणार आहे.” असंही भास्कर जाधवांनी बोलून दाखवलं.

हेही वाचा – Gujarat Election : …म्हणून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘एमआयएम’ उतरणार!

तर“आज ज्या पद्धतीने एखाद्याला तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. कोणावर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभागाची कारवाई केली जात आहे. आमचे नेते संजय राऊत यांचा काय दोष आहे. ५० कोटी एकेकाला तुम्ही दिलेत आणि ५५ लाखांसाठी तुम्ही त्यांना तुरुंगात बसवलयं. त्यांनाही तुम्ही शिवसेना सोडा नाहीतर खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं. पण संजय राऊतांनी सांगितलं की मोडेन पण वाकणार नाही आणि शिवसेना व उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्यात हिंमतीने ताकदीने उभा रहावं लागणार आहे.” असं आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav criticizes shinde group for freezing shiv senas symbol msr
First published on: 19-10-2022 at 13:59 IST