बॉलीवूडचा प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला मुंबई पोलिसांनी ‘एआयबी नॉकआऊट’ प्रकरणी समन्स पाठवला आहे. या कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह वर्तन आणि अश्लील शब्द वापरल्याचा मुद्दा गेल्यावर्षी उपस्थित झाला होता.
‘एआयबी नॉकआऊट’ या वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी ताडदेव पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स बजावण्यात आले आहे. करण जोहरसह अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सहभागी प्रेक्षकांवर अश्लिल टिपण्णी करणे असाही आरोप यांच्यावर आहे. या कार्यक्रमासाठी सेन्सॉरची परवानगी घेण्यात आली नव्हती असा ठपकाही आयजोकांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, निर्माता करण जोहरची चौकशी करुन पोलिस पुढील कारवाई करणार असल्याचीही माहिती मिळते आहे.
गेल्या वर्षी वरळी येथे एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aib roast row mumbai cops summon karan johar to record statementaib roast row mumbai cops summon karan johar to record statement
First published on: 09-01-2016 at 12:45 IST