scorecardresearch

Premium

मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत कायम, मंगळवारी सकाळी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १३६ वर

मुंबई शहराला मंगळवारी सकाळी हलक्या धुक्याने वेढल्याचे दिसून आले. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे.

Air quality in Mumbai
मुंबईतील हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत कायम, मंगळवारी सकाळी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १३६ वर (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मुंबई शहराला मंगळवारी सकाळी हलक्या धुक्याने वेढल्याचे दिसून आले. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे. समीर ॲपनुसार, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक मंगळवारी सकाळी १० वाजता १३६ इतका होता. तसेच यामध्ये पीएम १० च्या धूलिकणांची मात्रा अधिक असल्याचे निदर्शनास आले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर ॲपनुसार, बोरिवली, वरळी आणि मुलुंडमधील हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे ९३, ९३ आणि ८९ इतका होता. म्हणजेच येथे समाधानकारक हवेची गुणवत्ता नोंदली आहे. दरम्यान, शिवाजी नगरसह कुलाबा, शिवडी येथे हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत नोंदली गेली आहे. शिवाजी नगर येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २१७, शिवडीचा २५०, तर कुलाब्याचा २५१ इतका होता.

Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
Why strengthening of Ambazari lake in Nagpur
नागपूरच्या अंबाझरी तलाव बळकटीकरणाची गरज का? यंदाही पावसाळ्यात ‘ओव्हरफ्लो’ होणार का?
Completed survey of Maratha society and open categories in Mumbai print news
मुंबईमधील मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण पूर्ण; १४.९९ टक्के घरे बंद, ९.२३ टक्के कुटुंबिय नकारावर ठाम
Citizens are suffering due to increasing movement of dogs in Koparkhairane navi Mumbai
नवी मुंबई: श्वानांचा वाढता वावर, नागरिक त्रस्त

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान चांगले, ५१-१०० दरम्यान समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० दरम्यान वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता अतिधोकादायक समजली जाते.

हेही वाचा – मुंबईची तहान भागवण्यासाठी आता समुद्राचे पाणी, नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध

भारतीय हवामान विभागाकडून मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश, तमिळनाडूला पावसापासून दिलासा

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या हलक्या पावसाच्या अंदाजामुळे तमिळनाडूला मोठा दिलासा मिळाला आहे. मिचॉंग चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश तसेच तमिळनाडूत मुसळधार पाऊस झाला. विवध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत राहील. मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी उत्तर-किनारपट्टी आणि लगतच्या दक्षिण-किनारी आंध्र प्रदेशात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा

चक्रीवादळ उत्तरेकडे समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळ सरकण्याची शक्यता आहे आणि नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Air quality in mumbai remains in medium category mumbai air quality index stood at 136 on tuesday morning mumbai print news ssb

First published on: 05-12-2023 at 13:30 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×