scorecardresearch

Premium

मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा

ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या. परिणामी, मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

December Mumbai people sweat
मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची चाहुल लागली होती. मात्र, मुंबईसह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. चार – पाच दिवसांनंतर राज्यातील अवकाळी पाऊस थांबला असला तरी त्यानंतर मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २ ते ४ डिसेंबरदरम्यान मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली. ऐन डिसेंबर महिन्यात मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या. परिणामी, मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचॉंग’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीची चाहुल लागली होती. मात्र त्यानंतर मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्या दिवसापुरते वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, नंतर मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. दररोज ढगाळ वातावरण असून धुके पडत आहे. दरम्यान, ‘सुपर एल निनो’मुळे यंदा थंडी कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. डिसेंबर महिन्यात तापमान सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात काही प्रमाणात थंडी पडण्याचा अंदाज आहे.

success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
waiting journey for workers
रोहा दिवा मेमू रेल्वेची वेळ बदलल्यामुळे कामगारांना घरी परतण्याचा सव्वातासांचा प्रतिक्षा प्रवास
Governor, state government, ordinance, property tax, mumbai corporation, BMC
मुंबई : मालमत्ता करवाढ न करण्यावर स्वाक्षरी, राज्यपालांच्या सहीनंतर आता केवळ अध्यादेशाची प्रतीक्षा

हेही वाचा – मुंबई : वीज बिल मोबाइल ॲप डाऊलोड केले आणि बँक खात्यातील पैसे गेले

हेही वाचा – मुंबईची तहान भागवण्यासाठी आता समुद्राचे पाणी, नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध

चक्रीवादळाचा परिणाम

‘मिचॉंग’ चक्रीवादळामुळे थंडीत घट झाली आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याचे ‘मिचॉंग’ चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा एकूणच वातावरणावर परिणाम झाला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात एल निनोमुळे तापमान वाढले होते. ‘सुपर एल निनो’मुळे थंडी कमी असण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In the month of december mumbai people began to sweat people are waiting for the cold mumbai print news ssb

First published on: 05-12-2023 at 12:41 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×