आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंगळवारी फेरबदल केले. सहा नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. नव्याने शपथ घेतलेल्या सहा जणांपैकी तीन जणांना कॅबिनेट मंत्री म्हणून तर उर्वरित तिघांना राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटपही लगोलग जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नवीन मंत्र्यांचे खातेवाटप पुढील प्रमाणे…
कॅबिनेट दर्जा
मधुकरराव पिचड – आदिवासी विकास
दिलीप सोपल – पाणीपुरवठा
शशिकांत शिंदे – पाटबंधारे (कृष्णा खोरे विकास महामंडळ)
राज्यमंत्री
सुरेश धस – महसूल, पुनर्वसन
उदय सामंत – नगरविकास
संजय सावकारे – कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
खातेवाटप: पिचड-आदिवासी विकास, सोपल-पाणीपुरवठा, शिंदे-पाटबंधारे
आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंगळवारी फेरबदल केले.
Written by badmin2
First published on: 11-06-2013 at 04:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allocation of portfolios to the newly inducted ministers