माहिम येथे गेल्या महिन्यात कोसळलेल्या ‘अल्ताफ मॅन्शन’ या इमारतीच्या दुर्घटनेला रहिवासीच जबाबदार असल्याचे महापालिकेने याप्रकरणी तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
इमारतीच्या अंतर्गत व्यवस्थेत केलेले बदल, इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती न करणे आदी कारणामुळे ही दूर्घटना घडली असल्याचा दावा पालिकेने या अहवालात केला आहे.
गेल्या १० जून रोजी ही इमारत कोसळून त्यात दहा जणांचा मृत्यू झाला होता.