Amit Shah At Mumbai’s Shri Laxminarayan Temple: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (मंगळवारी) मुंबईतील महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. यावेळी ते मुंबईतील माधवबाग येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

यासंदर्भात अमित शहा यांनी एक्सवर (माजी ट्विटर) काही फोटो आणि एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमित शहा म्हणाले, “आज मी मुंबईतील माधवबाग येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात पूजा केली. तसेच मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. धार्मिक श्रद्धेचे केंद्र असण्यासोबतच हे मंदिर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. मी सर्वांच्या कल्याणासाठी भगवान श्री लक्ष्मीनारायण यांना प्रार्थना केली.”

दरम्यान या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माधवबाग येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रत्येक कणात देव वास करतो! मुंबईतील माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिन समारंभाला, आमचे नेते, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली.”

या पोस्टमध्ये पुढे म्हटेले आहे की, “१८७५ मध्ये स्थापन झालेल्या माधवबाग येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्याला आज पुन्हा एकदा उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. माधवबाग संस्था वेळोवेळी विविध सांस्कृतिक आणि लोककल्याणकारी कार्यक्रम आयोजित करून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.”

“या संस्थेशी संबंधित असंख्य दानशूर व्यक्तींनी दिलेल्या उदार देणग्यांमुळे, गायींच्या सेवेपासून ते इतर कामांपर्यंत विविध सामाजिक सेवा उपक्रम येथे मोठ्या प्रमाणात राबविले जातात. भविष्यातही असेच लोककल्याणकारी काम करत राहावे यासाठी मी माधवबाग कुटुंबाला शुभेच्छा देतो. मी तुम्हाला खात्री देतो की जेव्हा जेव्हा त्यांना समाजसेवेसाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा असेल तेव्हा आम्ही त्यासाठी नेहमीच तयार राहू”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, माधवबाग ट्रस्टचे मान्यवर व इतर मान्यवर उपस्थित होते.