बनावट धनादेशाद्वारे शिक्षण संस्थेच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याप्रकरणी वि. प. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँक ऑफ बडोदामधील सहव्यवस्थापकाच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आतापर्यंत साडेपाच लाख रुपये खात्यातून काढण्यात आल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: पत्रा चाळ प्रकल्पातील कल्पतरु रेडियन्स रहिवाशांच्या मुलांचे आगळे आंदोलन!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेच्या खेतवाडी शाखेचे सहव्यवस्थापक संजयकुमार भोलासिंह सिन्हा (४८) यांनी केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ व ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वि. प. रोड पोलिसांनी सांगितले. अशोक बाबूश्याम साहू याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून साहू कांदिवली पूर्व परिसरातील जानुपाडा येथे वास्तव्यास असल्याचे सूत्रांनी सांगितले. जे.बी.ए.एस कॉलेज फॉर वूमन एज्युकेशन डेव्हलपमेंट फंड, चेन्नई यांच्या खात्यातून १ ते ७ जानेवारी २०२२ या कालावधीत पाच धनादेशाद्वारे पाच लाख ७१ हजार रुपये रोख रक्कम काढण्यात आली होती. ती रक्कम संस्थेने काढली नव्हती. याबाबत बँकेने तपासणी केली असता चार बनावट धनादेशाद्वारे ही रक्कम काढण्यात आल्याचे उघड झाले. संबंधित धनादेश तक्रारदार सिन्हा यांच्या शाखेतून वठवण्यात आले होते. बँकेच्या तपासणीत ही बाब उघड झाल्यानंतर सिन्हा यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. संबंधित व्यवहाराची तपासणी सुरू असून लवकरच याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.