लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनासमोरील माती अमृत कलशाद्वारे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा भवनासमोरील मातीचा अमृत कलश स्वीकारण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने थेट राज्यपालांना पत्र पाठविले आहे.

आणखी वाचा-मुंबई: प्लास्टिक विरोधात कारवाई वेगवान; महानगरपालिकेच्या पथकात पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रखडलेल्या निकालामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागतो, तर काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया जाते. परंतु तरीही अनेक आव्हांनांवर मात करीत विद्यार्थी आपला निकाल प्राप्त करतात आणि विविध क्षेत्रात योगदान देतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आठवण म्हणून छात्रभारती विद्यार्थी संघटना मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोरील माती अमृत कलशाद्वारे राज्यपालांपर्यंत पोहोचवणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी सदर अमृत कलश स्वीकारून ‘माझी माती, माझा देश’ या अभियानासाठी राजधानी दिल्लीत न्यावा, अशी विनंती छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे.