अमृता साळवी प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. तरुंगातून सुटलेल्या अमृताची बुधवारी आठवले यांनी भेट घेऊन तिला आर्थिक मदत देत तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. ‘४५ दिवसांचे तान्हे बाळ वेश्याव्यवसायासाठी विकण्याचा प्रयत्न’ असा गुन्हा दाखल करणाऱ्या चारकोप पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही आठवले यांनी यावेळी केली. नवऱ्याने घराबाहेर काढल्याने हतबल झालेली अमृता साळवी उर्फ आफरिन शेख या विवाहीत तरुणीने आपले तान्हे बाळ एका संस्थेला देण्याचे ठरवले होते. परंतु दोन महिला दलालांनी ते विकण्याचा प्रयत्न केला होता. दलालांचा हा डाव लोकसत्ताने हाणून पाडला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
अमृता साळवी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा- आठवले
अमृता साळवी प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. तरुंगातून सुटलेल्या अमृताची बुधवारी आठवले यांनी भेट घेऊन तिला आर्थिक मदत देत तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली.
First published on: 24-01-2013 at 03:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrita salvi case should enquire by cid