आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. हेच औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही गाणी आपल्या मातीशी नातं सांगणारी असतात असं म्हणत अमृता फडणवीस यांनी ‘होठो पे सच्चाई रहती है..’ या ‘जिस देश में गंगा बहती है’ चित्रपटातलं गाणं म्हटलं आहे. तसंच या गाण्याचा व्हिडीओ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे अमृता फडणवीस यांची पोस्ट?

सगळ्यांना भारतीय गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा. काही गाणी ही आपल्या मातीशी आणि आपल्या मनाशी जोडली गेलेली असतात. ती म्हणताच देशभक्तीचे भाव आपल्या मनात आपोआप उमटत जातात. असं म्हणत अमृता फडणवीस यांनी जिस देश में गंगा बहती है चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गाण्याचा मिनिटभराचा भाग आहे. संपूर्ण गाण्याच्या व्हिडीओची युट्यूब लिंकही अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टसह पोस्ट केली आहे. अमृता फडणवीस यांनी गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी झालेल्या मुंबई फेस्टिव्हलमध्ये हे गाणं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता फडणवीस या त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी शिवतांडव स्तोत्रही पोस्ट केलं होतं. तसंच त्या आपल्या गाण्यांची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कायमच देत असतात. अमृता फडणवीस यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्या युट्यूब व्हिडीओवर विविध लोक कमेंटही करत आहेत. देशभक्तीपर गाणं म्हणून अमृता फडणवीस यांनी गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.