सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया पोलिसाला अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कैलास जनार्दन खामकर (४५) असे अटक आरोपीचे नाव असून तो घाटकोपर येथील भीमनगर परिसरातील रहिवासी आहे. एमआयडीसी परिसरातील एलिग्टंन बिझनेस पार्क परिसरात एक व्यक्ती पोलिसांचा गणवेश घालून फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त घालून खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी सायंकाळी खामकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांचे ओळखपत्र व इतर माहिती मागण्यात आली असता तो तोतया पोलीस असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>>मुंबईः कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार (३४) यांनी स्वतः याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भादंवि कलम १७०, ४२० व १७१ अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीजवळ सिगरेटची आठ पाकिटे सापडली. पोलिसांचा गणवेश घालून खामकर विक्रेत्यांकडून कमी किंमतीत सिगरेटची पाकिटे खरेदी करायचा आणि ती तो जास्त किंमतीला विकायचा, असे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.