इंदू मिलवरील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परदेश दौर महत्त्वाचे वाटत आहेत. त्यामुळे महापुरुषांबद्दल या सरकारला आदर नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वाशी येथे केले.
आघाडी सरकारच्या काळात नवी मुंबईमधील कोणत्याही प्रकल्पाला कधीही स्थगिती दिलेली गेली नाही. या उलट नवी मुंबईमध्ये जो काही विकास झाला आहे, हा विकास आघाडी सरकारच्या काळातच झाल्याचा दावा वाशी येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस प्रांताध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात नगरविकास खाते हे काँग्रेसकडे होते त्यामुळे नवी मुंबईचा खरा विकास राष्ट्रवादीने नव्हे तर काँग्रेसनेच केला आहे. असेदेखील चव्हाण म्हणाले
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘महापुरूषांबद्दल सरकारची अनास्था’
इंदू मिलवरील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परदेश दौर महत्त्वाचे वाटत आहेत.

First published on: 19-04-2015 at 04:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan slams govt