Chembur Attack : चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ९ एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील एका व्यावसायिकावर गोळीबार झाला. या व्यावसायिकावर झेन येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सद्द्रुद्दीन खान (५०) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यावसायिकाचं नाव असून ते मूळचे बेलापूरचे आहेत.

“सुद्द्रुद्दीन खान हे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दादर येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी शीव पनवेल मार्गावरील चेंबूरच्या डायमंड गार्डनर परिसरात त्यांची चारचाकी सिग्नलला थांबली होती. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या आणि हल्लोखोर घटनास्थळावरून पसार झाले”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हल्ला झाल्यानंतर सद्द्रूद्दीन खान यांना तत्काळ जवळच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात मोठ्या वर्दळीचा परिसर असून घटनेनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना शीव – पनवेल महमार्गावर घडल्याने या मार्गावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहनांना वाट मोकळी करून दिली. पोलिसांनी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तसंच, आरोपींच्या शोधासाठी पाच पथक तयार करण्यात आलं असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचंही पोलिसांनी नमूद केलं.