भिवंडी येथील पिराणीपाडा भागात रविवारी मध्यरात्री सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ामध्ये दोन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या वर्तकनगर पोलिसांच्या पथकावर रविवारी चाकूने हल्ला करण्यात आला. यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या डाव्या हाताच्या बोटांना चाकू लागल्याने ते जखमी झाले.
भिवंडी येथील पिराणीपाडा भागात राहणारे बरकतअली सैफुल्ला जाफरी व तबरेज जाकीर जाफरी या दोघा संशयितांना एका सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ामध्ये ताब्यात घेण्यासाठी मध्यरात्री  पोलिसांचे पथक गेले होते.त्यावेळी तेथील नागरिकांनी कारवाईला विरोध करत पोलिसांच्या पथकास धक्काबुक्की केली. तसेच बाबर जाफरी याने पोलीस उपनिरीक्षक भुजबळ यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात कारवाईस विरोध आणि हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .