मुंबई: देवनार पशुवधगृहात एका व्यापाऱ्याची ११ लाख रुपये असलेली बॅग एका रिक्षाचालकाने पळवली होती. याबाबत देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपीला पुणे येथून अटक केली.

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची विक्री होते. विविध राज्यातून शेतकरी आणि बकरी विक्रेते येथे बकरे विक्रीसाठी घेऊन येतात. राजस्थान येथून आलेल्या एका व्यापाऱ्याने बकरे विक्रीतून जमा झालेले ११ लाख रुपये एका बॅगेत ठेवले होते. मात्र अज्ञात चोराने ही बॅग लंपास केली. ही बाब लक्षात येताच व्यापाऱ्याच्या याबाबत तत्काळ देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आरोपी पुण्यातील पिंपरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास करून अल्ताफ कुरेशीला (२५) अटक केली. अल्ताफ कुर्ला येथे राहणारा असून तो रिक्षाचालक आहे. त्याने चोरलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.