Baba Siddique Shot Dead Breaking News : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे पूर्व येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली. हरियाणातील कर्नेल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून दोघेही २० वर्षांचे आहेत. त्यांना दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हे आरोपीत्यांच्यावर पाळत ठेवून होते, असं पोलिसांनी सांगितल्यांच टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्त म्हटलं आहे. तसंच, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीचाही पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा >> Baba Siddique : “बाबा सिद्दीकींना छातीवर दोन गोळ्या लागल्या, ज्या…” ; डॉ. जलील पारकर यांची महत्त्वाची माहिती

सिद्दीकी यांची हत्या कशी झाली?

दसऱ्याच्या दिवशी खेरवाडी, वांद्रे सिग्नल येथे देवींच्या विसर्जनाची मिरवणूक निघत असते. त्यामुळे या परिसरात दसऱ्याला गर्दी असते. सिद्दीका यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे. त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी बाबा सिद्दीकी पायी निघाले होते. यावेळी ६६ वर्षीय सिद्दीकी यांच्यावर रात्री ९.३० वाजता गोळीबार झाला. ९.९ एमएम पिस्तूलमधून सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामुळे गोळी लागताच सिद्दीकी जमिनीवर कोसळले.

यावेळी सिद्दीकी यांच्या गाडीलाही काही गोळ्या लागल्या. ज्यामुळे तीनहून अधिक गोळ्या झाडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांना आणखी तीन गोळ्यांची काडतुसे मिळाली आहेत. कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यपला पोलिसांनी अटक केली असली तिसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टर काय म्हणाले?

“साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना (Baba Siddique) रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आली. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकींना (Baba Siddique) दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत”, अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.