Shivsena Criticized Shinde Group : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्याच घाटावर या हरा*** राजकीय चिता पेटेल आणि हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल, असं शिवसेनेनं ‘सामना’त म्हटलं आहे. तसेच मुंबई दौऱ्यावरूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपुष्टात; शिवसेनेतील वादाबाबत निवडणूक आयोगाकडे लक्ष

“हीच बाळासाहेबांना खरी आदरांजी”

“शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उतलेले-मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरा*** राजकीय चिता पेटेल. हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा – ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबद्दल शरद पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”

मुंबई दौऱ्यावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीकास्त्र सोडलं. “मोदी हे पंतप्रधान म्हणून चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय?” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

हेही वाचा – शिवसेना, प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची आज घोषणा

“शिवसेनेचे मुखवटे लावून मंबाजी सत्तेत घुसले”

सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे. पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हातभार लावावा, याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरड्यात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले. पण गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत, तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत, अशी टीकाही शिसवेसेनेकडून करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray birth anniversary shivsena criticized shinde group and pm modi spb
First published on: 23-01-2023 at 07:45 IST